भाजपची शैली आत्मसात करण्याचा युवा आमदारांना शरद पवार यांचा कानमंत्र : – शरद पवार

मुंबई (परिवर्तनाचा सामना )

भाजपने राज्यात पुन्हा सत्तेत परतण्यासाठी कंबर कसली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीमधील युवा आमदारांनी आज शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी भाजपला राज्यात सत्तेत येऊ देणार नसल्याचा एल्गार केला. दुसरीकडे त्यांनी युवा आमदारांना कानमंत्र देताना भाजपची शैली आत्मसात करण्याचा सल्ला दिला

शरद पवारांची आज भेट घेणाऱ्यांमध्ये आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांचा समावेश आहे. यावेळी शरद पवार यांचा राजकीय उत्साह पाहून युवा आमदारांना चांगलेच प्रभावित झाल्याचे दिसून आले. शरद पवार यांनी युवा आमदारांसमोर भाजपला सत्तेत येऊ देणार नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर भाजपकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे त्यांनी सांगितले.

. त्यांच्याकडून शिका असा सल्लाही त्यांनी दिला.महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. चार राज्यात भाजपची सत्ता येऊ नये म्हणून विरोधक देव पाण्यात बुडवून बसले होते. पण, या मुंगेरीलालांची हसीन स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाही.

Latest News