PCMC: थकबाकी मिळकत धारकांच्या मिळकत जप्ती सोबत नळजोड तोडण्याची कारवाई…..
पिंपरी : ऑनलाईन परीवर्तनाचा सामना: ) कर संकलन विभागाने मार्च महिन्यात वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. विभागाने एकूण 442 मोठ्या थकबाकीरांच्या मालमत्ता जप्तीचे नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण 329 मिळकतींवर कारवाई करण्यात आली आहे
.एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांच्या मिळकत जप्तीसोबत नळजोड तोडण्याची कारवाई महापालिकेने केली आहे.आतापर्यंत 329 मिळकतींवर कारवाई करण्यात आली त्यापैकी 193 मिळकती सील करण्यात आल्या असून, त्यापैकी 60 जणांचे नळजोड तोडण्यात आले आहेत.
त्यापैकी 193 जणांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणा केला आहे. ती एकूण रक्कम 13 कोटी 81 लाख 50 हजार 535 इतकी आहे. तर, 138 मिळकतींना सील लावण्यात आले असून, काहींचे नळजोडही तोडण्यात आले आहेत.थकबाकीदारांमध्ये र्कशॉप, कंपन्या, मोबाईल टॉवर, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे.
त्यांच्याकडे दीड लाख ते 24 लाखांपर्यंत थकबाकी आहे.सील करण्यात आलेल्यांमध्ये चिखली विभागीय कार्यालय क्षेत्रातील सर्वांधिक 89 मिळकती आहेत. सांगवीतील 13, थेरगावातील 12, निगडी, प्राधिकरणातील 6, आकुर्डीतील व महापालिका भवन येथील प्रत्येकी 5, चिंचवड व मोशी मधील प्रत्येकी 3 आणि भोसरीतील 2 मिळकती सील केल्या आहेत.थकबाकीसह संपूर्ण बिल भरून कारवाई टाळा महापालिकेच्या 16 कर संकलन कार्यालयाकडून थकबाकीदारांकडून वसुली मोहिम कारवाई तीव— केली आहे.आतापर्यंत एकूण 472 कोटी 37 लाखांचा एकूण मिळकतकर जमा झाला आहे. नागरिकांनी थकबाकीसह मिळकतकर भरून जप्ती कारवाई तसेच, विलंब दंड टाळावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.