शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू – देवेंद्र फडणवीस

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्रं आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहावं लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, अशी जोरदार टोलेबाजीही फडणवीसांनी केली
य.एमआयएमने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर दिलीय. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. एमआयएमने त्यांच्यासोबत जावं. ते शेवटी एकच आहेत. भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी ते काय करत आहेत ते पाहू. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलं आहे.
अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढलायएमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यांची छुपी युती आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे आणि हेच समीकरण राहणार आहे
. यात बाकी कुणीही काही करु शकत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आहोत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. एमआयएम आणि भाजपची युती सर्वांनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पाहिली आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी एमआयएमवर जोरदार हल्ला चढवलाय.एमआयएमचे औरंगाबादचे खासजार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला खुली ऑफर दिलीय.
तुमचं तीन चाकाचं सरकार आहे. त्याला एक चाक जोडून चारचाकी बनवा, आम्हाला सोबत घ्या, अशी ऑफर जलील यांनी दिलीय.