कात्रज मधील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय दोन वर्षानंतर पर्यटकांसाठी खुले…

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय दोन वर्षानंतर पर्यटकांसाठी खुले झाले. याचा पर्यटकांनाही मोठा आनंद झाला असल्याचे पर्यटकांशी बोलताना पहायला मिळाले. तर प्राणी संग्रहालय प्रशासनाच्यावतीने पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी पर्यटकांचे स्वागत केले. यावेळी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी सुचित्रा सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.कोरोनामुळे गेले दोन वर्षे बंद असलेले राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आज (रविवार) सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी खुले झाले. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 8 वाजल्‍यापासून पर्यटकांनी तिकिटासाठी रांगा लावल्या होत्या.

Latest News