सत्तधाऱ्याच्या दबावामुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा खुळखुळा: …संजय राऊत

नागपूरमध्ये : शिवसेना जिथं लढू शकली नाही, तिथं शिवसेना मजबूत करणार” असून , सध्या केंद्रीय तपास यंत्रणेचा खुळखुळा झालेला आहे. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसालाही ईडीचं भय दाखवलं. बंगालमध्ये ईडीच्या सर्वात जास्त कारवाया झालेल्या आहेत. दहशत हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकणार नाही. तपास यंत्रणांना वापरलं जात आहेत.अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

यावेळी शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी अनुपस्थितीत असल्यामुळे त्यासंबंधी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, “त्यांनी रितसर परवानगी घेतल्याने त्या अनुपस्थित आहेत.

“ज्या जागा महाविकास आघाडीकडे नाहीत. त्या जागांवर लक्ष आहे. नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.”महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार जरी असलं तरी, राज्यात शिवसेना महत्वाचा पक्ष आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेनं ताकदीनं काम करावं, कार्यकर्त्यांना बळ द्यावं, शिवसेनेविषयी लोकांमध्ये जे गैरसमज पसरवले गेले आहे, ते दूर करण्यासाठी शिवसंवाद यात्रा आयोजित केलेली आहे.

Latest News