सप्तर्षी फाउंडेशन ने सततचा पाठपुरवठा करून 140 लाभार्थीचा रक्कम लाभार्थ्यांचा खात्यात जमा…

संस्थेच्या वतीने येत्या काळात समग्र दिव्यांग सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार असून यामुळे हजारो दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आवश्यक दाखले, कागदपत्रे, योजनांची माहीती, समुपदेशन, आरोग्य शिबिरे, कॉल सेंटर,मोबाईल ॲप व विविध संलग्न सेवा इ. देण्याचा संकल्प संस्थेने केलेला आहे. अशा प्रकारच्या दिव्यांग उपयुक्त सेवा देणारे केंद्र म्हणजे सर्व दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे

. तरी यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी व त्यांच्या पालकांनी सहयोग करणे अपेक्षित आहे की जेणे करून या दिव्यांग केंद्राचा लाभ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचेल. तरी सर्वांनी संस्थेचे सभासद होऊन प्रत्यक्ष कार्यात सहभाग नोंदवून सहाय्य करावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव श्री. मनोजकुमार बोरसे यांनी केले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांना मिळत असलेल्या सुविधा आणि योजनांचे मूल्यमापनात्मक विश्लेषण संस्थेने केले आहे.

निवेदनामुळे महानगरपालिकेला आपल्या क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्यास मदत होणार आहे याच लाभ भविष्यात हजारो दिव्यांग व्यक्तींना होणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी प्रशासनाला अधिकाधिक सहयोग करण्याचा मानस असल्याचे श्री. मनोजकुमार बोरसे यांनी सांगितले आहे

फाउंडेशन या संस्थेच्या सततच्या पाठपुरव्यांमुळे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पालिकेतर्फे जो आर्थिक लाभ दिला जातो तो मागील काही वर्षांचा लाभ प्रलंबित होता. मागील अनेक वर्षांपासून सप्तर्षी फाउंडेशन ने या प्रलंबित लाभाविषयी आवाज उठवून सततचा पाठपुरवठा करून जवळपास १४० लाभार्थीचा प्रलंबित चेकची रक्कम लाभार्थ्यांचा खात्यात जमा होतील. हे करत असताना महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून मदत मिळत आहे अशी माहिती संस्थेचे संस्थपक सचिव श्री. मनोजकुमार बोरसे यांनी दिली. सप्तर्षी फाउंडेशन गेली अनेक वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त सेवा पुरवीत आहे. आज पर्यंत संस्थेकडून सेवेचा लाभार्थीची संख्या ही हजारोंमध्ये आहे.

Latest News