२५ मार्च रोजी एच आर मीट २०२२* ————— *डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजकडून आयोजन* –


*————————पुणे :’डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘एच.चार.मीट २०२२’ चे आयोजन २५ मार्च रोजी,सायंकाळी ६ वाजता, हॉटेल ब्ल्यू वॉटर (रावेत ) येथे करण्यात आले आहे.फिनोलेक्स इंडस्ट्रीज,ए-वन व्ह्यू पब्लिकेशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोंनेल मॅनेजमेंटच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले आहे.डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ.आशुतोष मिसाळ यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.’ अॅकोमोडेशन ऑफ जेन-झेड इन कॉर्पोरेट वर्ल्ड’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे .डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’चे कार्यकारी संचालकविंग कमांडर पी.व्ही.सी. पाटील, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मुख्य मानव संसाधन अधिकारी राज वेळारकर यांच्या हस्ते ,डॉ.भरत चव्हाण-पाटील, डॉ.जे.जी. पाटील यांच्या उपस्थितीत या ‘एचआर मीट’चे उद्घाटन होणार आहे.कार्पोरेट जगतातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. ‘ अॅकोमोडेशन ऑफ जेन-झेड इन कॉर्पोरेट वर्ल्ड’ या परिसंवादामध्ये शावल मूर्ती(विप्रो),डॉ.मीनल राव(थरमॅक्स), शिल्पा कुलकर्णी(सी ए),पूर्णिमा कुमारी (कोर्टयार्ड बाय मेरीयट)हे मान्यवर सहभाग घेणार आहेत………..