पाणी कनेक्शनसाठी ”लाच” घेणाऱ्या एका कंत्राटदाराला अटक…

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- कंत्राटदाराने लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चतुश्रृंगी विभागात तक्रार दाखल केली. त्यानंतर ब्युरोने सोमवारी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. दुसऱ्या दिवशी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी कर्वे रोडवरील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात सापळा लावून .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चतुश्रृंगी विभागात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मिळवण्यासाठी या कंत्राटदाराने 17,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. महेश शिंदे (54) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याला अटक करण्याक आली आहे.
कनेक्शन देण्यासाठी शिंदे यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे आहेत, तसेच प्लंबरला 2 हजार रुपये द्यावे लागतील, असे ठेकेदाराने तक्रारदाराला सांगितले. त्याच्या या मागणीनंतर लाचलुचपतने सापळा रचला. तक्रारदाराकडून या ठेकेदाराने यावेळी 17,000 रुपयांची लाच घेतली. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून या ठेकेदाराला अटक केली. महामंडळाचे अधिकारी आणि प्लंबर यांनीही लाच मागितल्याच्या दाव्याची आता ब्युरो चौकशी करत आहे.