PCMC: पिंपळे गुरव प्रभागातून राष्ट्रवादीतर्फे शामभाऊ जगताप यांनी फुंकले रणशिंग


इच्छुक उमेदवार अर्ज व कार्यअहवाल शहराध्यक्षांकडे केला सादर
पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक तयारीला लागले असून, पिंपळे गुरव प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शामभाऊ जगताप यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपळे गुरव प्रभाग 41 व 44 च्या संपर्क अभियान कार्यक्रमाचे औचित्य साधून शामभाऊ जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून आपला अर्ज व कार्यअहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे सादर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपळे गुरव प्रभाग 41 व 44 च्या संपर्क अभियान कार्यक्रमाचे बुधवारी सायंकाळी मुक्तांगण लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळे गुरवमधून उमेदवारीचे प्रबळ दावेदार शामभाऊ जगताप यांच्या कार्यअहवालाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, ज्येष्ठ मा. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, मा. नगरसेवक मयूर कलाटे, मा. नगरसेवक कैलास बारणे, मा. नगरसेवक संतोष बारणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, मा. नगरसेवक अतुल शितोळे,
राष्ट्रवादी काँगेसचे मा. कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, मा. स्वीकृत सदस्य शिवाजी पाडुळे, माधव पाटील, मा. नगरसेविका मायाताई बारणे, मा. नगरसेविका चंदाताई लोखंडे, महिला कार्याध्यक्ष उज्ज्वला ढोरे, महिला प्रभाग अध्यक्ष तृप्तीताई जवळकर, कविताताई जगताप, इंद्रायणीताई देवकर, मीराताई शेळके, अश्विनीताई जगताप, मा. नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तानाजीभाऊ जवळकर, मा. नगरसेवक राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, बाळासाहेब काशीद, अंकुशअप्पा जवळकर, पै. गणेश काशीद, बाळासाहेब भालेकर, पै. गणेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते संदीप राठोड, विष्णू शेळके, संतोष देवकर, बाळासाहेब पिल्लेवार, सतीश चोरमले, दत्ता कदम, मुकेश पवार, तसेच प्रभाग क्र ४१ व ४४ मधील नागरिक, शामभाऊ जगताप मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळे गुरवमधून शामभाऊ जगताप यांनी निवडणुकीची नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे. युवकांची फौज हे शामभाऊ जगताप यांचे मोठे बलस्थान आहे. तसेच पिंपळे गुरवमधील दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर ते निवडणुकीत विजयाची पताका रोवणार, यात शंका नाही. संपर्क अभियान कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहाराध्यक्ष व उपस्थित मान्यवरांनी शामभाऊंच्या कार्याचा केलेला गौरव, ही याचीच एक पोचपावती आहे.