नाना पेठेत परिसरात मंडप साहित्याच्या गोदमास आग..
पुणे येथील नाना पेठेत क्वार्टर गेट चौक परिसरात मंडप साहित्याच्या गोदमास आग लागल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. आगीत मंडप साहित्य जळून भस्मसात झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले.यावेळी एक जण जखमी झाला असून आग विझवताना अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व अग्निशमन जवान सुधीर नवले यांच्या पायाला जखम झाली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याच काम सुरू होते.बांबू, पडदे, सजावट साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. 10 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या