PCMC: आयत्या पिठावर रेघोट्या’मारणाऱ्या भाजपमुळे शहराच्या विकासाला ब्रेक :म माजी विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपरी-( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) आयत्या पिठावर रेघोट्या’मारणाऱ्या भाजपमुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. म्हणून शहर विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी अजितदादांसारख्या दृष्ट्या नेत्याच्या हातात पुन्हा महापालिकेची सत्ता असायलाच हवी त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रवादीला पुन्हा महापालिकेत संधी द्यावी, असे आवाहन माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केले.

शहर विकासापेक्षा स्वार्थाला आलेले महत्त्व, नेत्यांमध्ये नसलेले एकमत आणि भ्रष्टाचार हाच एकमेव भाजपचा अजेंडा होता. त्यामुळे शहराचा विकास भरकटला, गेल्या पाच वर्षांत केवळ ठेकेदार आणि स्वत:चा आर्थिक फायदा कसा होईल यालाच महत्त्व देण्याचे आले. भाजपच्या राज्यपातळीवरील एकाही नेत्याचे नियंत्रण स्थानिक पातळीवर नसल्याने दोन्ही आमदारांनी ‘हम करे सो कायदा’ आणि आम्ही म्हणेल तो विकास या दंडेलशाहीने कारभार केला. दोन्ही आमदारांनी शहराचे दोन भाग करून ठेकेदारी केल्याने शहराचे पाच वर्षांत वाटोळे झाले, असा हल्लाबोल पिंपरीतील माजी महापौर हनुमंत भोसले यांनी केला. गतवेळी महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांनी रामराज्य आणण्याचे स्वप्न दाखवले. प्रत्यक्षात त्यांनी रावणराज्य आणले. खंडणीखोरी, दादागिरी, लाचखोरी, भ्रष्टाचारामुळे शहरवासियांना यातना भोगाव्या लागल्याने जनता यावेळी भाजपला नक्कीच त्यांची जागा दाखविणार यात शंका नाही.

त्यामुळे महापालिकेत पुन्हा रामराज्य आणावयाचे असल्यास भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. माजी नगरसेवक विनोद नढे, शितल काटे, मच्छिंद्र तापकीर, कैलास थोपटे, राजेंद्र साळुंखे, अनिता तापकीर आदींसह इच्छूकही यावेळी काळेवाडीतील या सभेला उपस्थित होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या असल्या, तरी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक तयारी सुरुच ठेवली आहे

शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क अभियान ते घेत असून त्यातून मावळते सत्ताधारी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला जात आहे. 2017 मध्ये सत्तेत आल्यानंतर शहराचा विकास आणि प्रगती व्हावी असा दुरदृष्टीचा विचार भाजपच्या कोणत्याही नेत्याने न करता केवळ निविदांमध्ये पैसे खाण्यासाठी त्यांनी शहराचे तुकडे केले, असा हल्लाबोल माजी महापौर हनुमंत भोसले यांनी बुधवारी (ता.३० मार्च) या अभियानात पिंपरीत केला. तर, गेल्या पाच वर्षांत शहर विकासाला ‘खिळ’ बसली असून एकही ठोस काम भाजपने केले नसल्याचा आऱोप महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी याअभियानात चिंचवडमध्ये केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग संपर्क अभियानाला पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.

त्यामुळे शहराला पुन्हा पुर्नवैभव प्राप्त करून द्यायचे असल्यास तसेच शहर विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणावयाची झाल्यास राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. माजी नगरसेविका गीता मंचरकर, विनायक रणसुंभे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य फजल शेख तसेच मनिषा गटकळ आदींसह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News