राज ठाकरे सरड्या सारखे रंग बदलतात : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

पुणे : , राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांना नकला आणि टीका करण्याशिवाय काहीच येत नाही. त्यांनी एकदा परीक्षण करावं की त्यांचे आमदार त्यांना सोडून का गेले. नुसती भाषणं करुन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. तसेच केंद्राच्या विरोधात मागे राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरूनही त्यांनी टोलेबाजी केलीय. राज ठाकरे हे केवळ पलट्या मारतात, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर अक्कल दाढच काढली आहे. एवढ्याा लेट सरकार स्थापनेबाबत बोलायला कसं सुचलं? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे या भाषणाने राज्यातलं राजकारण जोरदार ताप आहे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार पलटवारही केला आहे.त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्यापाहटेच्या शपथविधीचाही खरपूस समचार घेतला. एवढंच काय त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांनाही सोडलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांची नक्कलही केली. त्यावरूनच आता राज राज ठाकरेंवर जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शनिवारी रात्रीपासूनच राज ठाकरेंवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीकाची झोड उडवली आहे. सर्वात आधी राज ठाकरेंचा जयंत पाटलांनी समाचार घेतला. सकाळपासूनही राज ठाकरेंवर तीव्र टीका होत आहे. त्यानंतर आता अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत राज ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला आहे.

Latest News