PCMC: चाकण येथे 198 किलो गांजा जप्त


PCMC- चाकण ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार,सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले, पोलिस उपनिरीक्षक राजन महाडिक हे चाकण – शिक्रापूर रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते.दरम्यान, पोलिस अंमलदार संदीप पाटील, मनोज राठोड, अशोक गरगोटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एकजण व्यक्ती चारचाकी आयशर गाडीत गांजा घेऊन शेलपिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली.विक्रीसाठी वाहनात लपून आणलेला तब्बल 198 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला
या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहितेवाडी, चाकण येथे ही कारवाई केली.गोकुळ शिवाजी आगे, अरुण जगन्नाथ मोहिते, ज्ञानेश्वर उत्तम मोहिते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
. तर, दीपक शिवराम पवार, रवींद्र उत्तम मोहिते हे फरार झाले आहेत.अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 198 किलो गांजा, चारचाकी वाहन, मोबाईल असा 63 लाख 34 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यानुसार, पथकातील पोलिसांनी दोन टीम करून मोहितेववाडी येथील हॉटेल संतोष समोरील रस्त्यावर सापळा रचला
. काही वेळातच संशयित वाहन त्या ठिकाणी आले असता आरोपी गोकुळ आगे याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीच्या इंजिनच्या जवळ ताडपत्री टाकून कोणालाही संशय येणार नाही, अशा पद्धतीने गांज्याची 93 पाकिटे लपवलेली आढळून आली. पुढील चौकशीत आगे याने त्याच्या अन्य साथीदारांची नावे सांगितली.