मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही- मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे

पुणे- ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला आहे. मशिदीवरील भोंगे काढले नाही तर हनुमान चालीसा लावणार असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मध्ये तर हा शब्द आहे याचा अर्थ राज्य सरकारने ही कारवाई करावी अशी अपेक्षा आहे,.आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात त्यांनी हनुमान चालीसा लावली. मी माझ्या प्रभागात असे काही करणार नाही आहे, असं मत मनसे शहराध्यक्षा वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या रमजान सुरु आहे, मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे याव्यतिरिक्त राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मी त्यांच्यावर किंवा पक्षावर नाराज नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेतला. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे.

सध्या राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मशिदीवरील भोंग्यांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या मुद्द्यावरून मनसेतही अंतर्गत नाराजी निर्माण झाल्याचंही दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

Latest News