पिंपळे गुरवमध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग; नागरिक हैराण दिवसातून दोन वेळ कचरा उचलण्याची गरज माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

पिंपळे गुरवमध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग; नागरिक हैराण दिवसातून दोन वेळ कचरा उचलण्याची गरज माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

पिंपरी, प्रतिनिधी : शहर कचराकुंडीमुक्त करत असताना नियोजन नसल्याने पिंपळे गुरवच्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. रस्त्यांच्या कडेचा कचरा तात्काळ उचलून नागरिकांची दुर्गंधीतून मुक्तता करावी, अशी मागणी राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की शहर परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोकरदार, आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे नागरिक यांना घंटागाडी येण्याच्या वेळी घरी थांबता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवून त्यातील कचरा सकाळ संध्याकाळ उचलण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. जेणेकरून हा कचरा रस्त्यावर येणार नाही, तसेच नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. कुठेही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या कचर्‍यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. आता कचराकुंड्या उचलल्याने कचरा कुठेही अस्ताव्यस्त पडणार नाही, अशी महापालिकेची अपेक्षा होती

. मात्र, आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे, नोकरदार यांना महापालिकेच्या घंटागाडीची वेळ गाठता येत नाही. त्यामुळे असे नागरीक सकाळी कामाला जाताना किंवा कामावरून आल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडतात. पण कचराकुंडीच नसल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे ठराविक ठिकाणी कचराकुंड्या ठेवून त्या दोन वेळा उचलण्याची उचलण्यात याव्यात, असेही राजेंद्र जगताप यांनी सांगितले. —————–

————————गेली पाच वर्षे सत्ता भोगलेल्या सत्ताधारी भाजपच्या माजी नगरसेवकांना आपला कार्यकाळ संपला असल्याने नागरिकांच्या समस्यांशी काही सोयरसुतक राहिलेले दिसत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तरी नागरिकांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. महापालिकेने किमान ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवावी. जेणेकरून कामावर जाताना किंवा कामावरून आल्यानंतर या लोकांना कचरा टाकण्याची सोय होईल. या कचरा कुंड्यातील कचरा उचलण्यासाठी दिवसातून दोन वेळा कॉम्पॅक्टर आल्यास कचराकुंड्यातील कचरा अस्ताव्यस्त होणार नाही. – राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस