स्वयंसेवी संस्थांच्या ‘कपॅसिटी बिल्डिंग ‘साठी 16 एप्रिल रोजी ‘एनजीओ मीट 2022

राष्ट्रवादी काँग्रेस एनजीओ सेल आणि लायन्स क्लबचा उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस एनजीओ सेल आणि लायन्स क्लबचा उपक्रम

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- कोरोना साथीच्या काळानंतर, समाजाच्या उन्नतीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामाला गती मिळण्यासाठी ‘कपॅसिटी बिल्डिंग ‘ विषयावर १६ मार्च रोजी पुण्यात ‘एनजीओ मीट २०२२’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एनजीओ सेल आणि लायन्स क्लब ने यासाठी पुढाकार घेतला असून १६ एप्रिल रोजी सकाळी ०९.३० ते दुपारी ०१.३० या वेळेत हॉटेल क्लार्क इन, जंगली महाराज रोड, पुणे येथे आयोजन केले आहे. खा . अॅड वंदना चव्हाण या प्रमुख पाहुण्या नात्याने स्वयंसेवी संस्थांनाही मार्गदर्शन करतील.

संयोजक समितीच्या वतीने अनिल मंद्रुपकर, प्रमोद उमरदंड, किशोर मोहोळकर, विश्वास सूर्यवंशी,डॉ. दीप्ती काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्माईल संस्थेत ही पत्रकार परिषद ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता झाली.

अनिल मंद्रुपकर (कार्यशाळेचे उद्दिष्ट आणि क्षमता वाढीची गरज)
दिलीप देशमुख–माजी धर्मादाय आयुक्त,पुणे (धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाज),लायन सीए सुरेश मेहता(एनजीओसाठी प्रभावी प्रशासन आणि कायदेशीर पैलू),लायन सीए राम डावरे(एनजीओसाठी ८०-जी,१२ ए,आय आय सी ए नोंदणी),डॉ अनिल धनेश्वर(सीएसआर निधी मार्गदर्शक तत्त्वे) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत .एनजीओ आणि त्यांच्या समस्यांबद्दल या परिषदेत चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रातील ५० स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. संस्था नोंदणीची अंतिम तारीख १० एप्रिल आहे.कृपया संस्था नोंदणी तपशिलांसाठी मयूर बागुल यांच्याशी (8329757875 /9096210669)संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणी शुल्क ५०० रुपये प्रति व्यक्ती असेल.

Latest News