ईस्टर संडे’ निमित्त मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये विविध कार्यक्रम

‘ईस्टर संडे’ निमित्त मेथडिस्ट मराठी चर्चमध्ये विविध कार्यक्रम

पुणे :दोन वर्षांच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ईस्ट स्ट्रीट कॅम्प मधील मेथडिस्ट मराठी चर्चच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे ईस्टर संडे साजरा होणार आहे.चर्चच्या वतीने रेव्हरंड चंद्रशेखर जाधव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.रविवारी ,१७ एप्रिल ​या दिवशी ‘पुनरुत्थान दिन’ साजरा करण्यात येणार आहे.सकाळी साडेसहा ते सकाळी आठ या वेळेत चर्चमध्ये प्रार्थना करण्यात येणार आहे.रेव्हरंड चंद्रशेखर जाधव हे मार्गदर्शन करणार आहेत.संयुक्त उपासनेतील गाण्यांदरम्यान एड.मार्कस देशमुख हे ऑर्गन वादन करणार आहेत.वंदना घोडके संचलन करणार आहेत.२ मार्च ते १७ एप्रिल दरम्यान मेथडिस्ट मराठी चर्चच्या वतीने ‘लेंट समयातील’उपक्रम सुरु असून ईस्टर संडे चे कार्यक्रम हा त्यातील एक भाग आहे. सर्वांसाठी मुक्त प्रवेश असल्याची माहिती दिली

Latest News