पोटनिवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यावर चंद्रकांत पाटील यांच्यावर सेनेकडून जोरदार टीका…

पुणे : (परिवर्तनाचा सामना )- कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीचा निकाल आज लागला. त्यामध्ये भाजपाच्या सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. त्यांच्याविरोधात महाविकासआघाडीकडून कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे.

दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक आपण हरलो तर हिमालयात जाणार असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यानंतर आता या निवडणूकीत त्यांचा पराभव झाल्यावर लोकांनी त्यांच्यावर टीका करत मीम्स व्हायरल केले आहेत युवासेना चे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश पळसकर यांनी हे पोस्टर चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील मतदारसंघ कोथरुडमध्ये लावले आहेत. निकालानंतर चंद्रकात पाटील हिमालयात जाण्यासाठी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून शिवसेनेकडून त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी एक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी तयारी करताना आपल्याला दिसत आहेत

. चंद्रकांत पाटील हिमालयात कधी जाणार असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे हिमालयातील फोटो व्हायरल होत असून लोकांकडून त्यांना हिमालयात जाण्यासाठी मागणी केली जात आहे.कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यावर चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका होताना आपल्याला पहायला मिळत आहे.

त्यांच्याविरोधात सोशल मीडियात मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. पुण्यातही स्वत:च्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या नावाचं हरिद्वारचं तिकीटही बुक करण्यात आलं आहे. त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही AC तिकीट बुक केलं आहे असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्याबरोबर पुण्यातही चंद्रकांतदादा हिमालयात कधी जाताय? अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत

. .

Latest News