चिंचवड स्टेशनच्या झोपड्या वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल… राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळूराम पवार
पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील रेल्वेच्या हद्दीतील आनंदनगर मधील 976 घरांना आणि साईबाबा नगर मधील 490 घरांना 11 एप्रिल 2022 रोजी सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार जागा खाली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली होती.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेचे विधी समितीचे माजी सभापती काळूराम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेची एक प्रत पुणे येथील रेल्वेच्या लीगल अडव्हायझर यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आली.
पिंपरी महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.चिंचवड स्टेशन येथील रेल्वेकडेच्या झोपड्या वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळूराम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.महापालिका प्रशासनाने 1984 साली आनंदनगर येथील लोकवस्तीला झोपडपट्टी म्हणून घोषित केले आहे. याठिकाणी झोपडपट्टीमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या विनंतीनुसार रेल्वेच्या लगत असणार्या जागेत महापालिका प्रशासनाने दोन कोटींची सीमाभिंत बांधली ही बाब वकिलांमार्फत निदर्शनास आणून दिली. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे. असे पवार यांनी सांगितले.