अर्धवटराव आधी भाजप विरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले…


मुंबई : पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, अशा खोचक शब्दात धनंजय मुंडेंनी टीका केली राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत बोलताना राज ठाकरेंचा अर्धवटराव असा उल्लेख केला आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात तसेच उत्तरसभेत देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) सडकून टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेते व मंत्र्यांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला. तसेच मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत दरम्यान, धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना रामदास पाध्येंच्या अर्धवटरावांची उपमा देत डिवचलं आहे. तर माणसं सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं आहे, अशी टीका देखील धनंजय मुंडेंनी भाजपला (BJP) उद्देशून केली