इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपची रविवारी शांती पदयात्रा..


पुणे :धर्माच्या नावावर भावना भडकाविण्याचे प्रयत्न होत असताना शांतता, बंधू भाव जोपासण्याचे आवाहन करण्यासाठी पुण्यात कोंढवा ते डॉ.आंबेडकर पुतळा,गांधी पुतळा ( पुणे स्टेशन ) मार्गावर इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने शांती पदयात्रा काढण्यात येणार आहे.इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रविवार, २४ एप्रिल रोजी ज्योती हॉटेल ( कोंढवा ) येथून सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. धर्मनिरपेक्ष मूल्य मानणाऱ्या संस्था, संघटना सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी शांतीचे प्रतिक म्हणून सफेत पोशाख परिधान करावा, मात्र, राजकीय झेंडे आणू नयेत असे आवाहन बागवान यांनी केले.