पोलिसांनी राणा दाम्पत्याला अमरावतीमध्येच स्थानबद्ध करण्याचे नियोजन…


मुंबई :
राण दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर गेस्ट हाऊसवर राहणार होते. त्यासाठी बुकिंगही झाले होते. पण प्रत्यक्षात मुंबईत आल्यानंतर ते तिथे पोहचलेच नाहीत. पोलिसांनीही तिथे बंदोबस्त तैनात केला होता. पण ते तिथे न आल्याने नेमके गेले कुठे, याचा शोध पोलिसांसह शिवसैनिकही घेत होते. अखेर राणा हे खार येथील निवासस्थानी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलीसांनी तातडीने त्यांच्या घरी जात नोटीस बजावली. जमावबंदी आदेशाचा किंवा कायदा-सुव्यवस्थे बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये, अशी नोटीस त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंब यांनी बजावली. तसेच कृत्य केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहेमुख्यमंत्री यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठणाचा निर्धार खासदार आणि आमदार यांनी केला आहे. पण ते शुक्रवारीच मुंबईत दाखल झाले. सुरूवातीला त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. पण पोलिसांनी अखेर त्यांच्या शोध घेतला असून दोघेही खार येथील निवासस्थानी आहेत.राण दाम्पत्य आज सकाळीच मुंबईमध्ये दाखल झाले आहे. यापूर्वी ते आज (ता. २२ एप्रिल) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. पण पोलिस आणि शिवसैनिकांच्या हातावर तुरी देवून दोघेही मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून पोलिसांनी राणा दाम्पत्याला अमरावतीमध्येच स्थानबद्ध करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे मागील २ दिवसांपासून अमरावती पोलिस खासदार राणा आणि आमदार राणा यांच्यावर नजर ठेवून होते. तर मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार म्हणून शिवसैनिक देखील आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी राणांना तुम्ही केवळ बडनेरा स्थानकावर पोहचून दाखवा असे आव्हान दिले होते. मात्र या सर्वांच्या हातावर तुरी देवून राणा दाम्पत्य एक दिवस आधीच मुंबईत दाखल झाले आहेतदरम्यान, राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी केली आहे. त्यामुळे वातावरण अधिक तणावग्रस्त बनलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मातोश्रीकडे वाईट आणि वाकड्या नजरेने बघू नका अन्यथा परिणाम बघा असा इशारा दिला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला आहे. बॅरिकेटींग करण्यात आली आहे. तसेच मातोश्री बाहेरील एक रस्ता संपूर्णपणे बंद करत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत सोडले जात आहे.