पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य सहाय्य्क प्रियांका शिंदे, दीपाली जगदाळे यांनी पावती पुस्तकात फेरफार केल्याने शिस्तभंगाची कारवाई : आयुक्त राजेश पाटील


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग सक्षम व्हावे या उद्देशाने स्थापत्य सहायकाची नेमणूक केली होती मात्र काही कर्मचारी त्यांचाही गैरफायदा घेत महापालिकेच्या तिजोरी वर डल्ला मारण्याचे काम सुरु आहे अतिक्रमण विभागाकडून आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दंडात्मक कारवाई केली जात आहे.त्या पावत्या मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य सहाय्य्क प्रियांका शिंदे, दीपाली जगदाळे यांनी पावती पुस्तकात फेरफार केल्याने शिस्तभंगाची कारवाई केली असल्याची माहिती : आयुक्त राजेश पाटील यांनी दिली
अतिक्रमण कारवाईनंतर देण्यात येणाऱ्या पावती मध्ये महापालिका कर्मचारी फेरफार करून महानगरपालिकेची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावती देताना एक रक्कम दाखवली जात आहे तर ओसी वर दुसरी रक्कम दाखवून सर्वसामान्य लोकांची लूट करण्यात येत असले बाबत अनेक तक्रारी आयुक्त राजेंश पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळं कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत
सामान्य पावती पुस्तकावरील नोंदी मधील तफावत असले बाबतच्या श्रीमती प्रियांका शिंदे व श्रीमती दिपाली जगदाळे यांनी सादर केलेल्या खुलाशावर यांचा खुलासा संयुक्तिक वाटत नाही असा अभिप्राय क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेला आहे.
सदर प्रकरणी माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी उपरोक्त श्रीमती प्रियांका शिंदे व श्रीमती दिपाली जगदाळे यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत.