आमदार रवी राणा, खा.नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल…
मुंबई : सरकारविरोधात त्यांनी द्वेष आणि आव्हान दिलं होतं. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले होते. शांतता राखून त्यांना परतण्याची १२९ कलमांतर्गत पोलिसांनी नोटीस पाठवली होती. पण ही नोटीस झिडकारून त्यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिलं होतं. त्यामुळं राणा दाम्पत्यावर कलम ‘१२४ अ’ अतंर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे” त्यामुळं आमदार रवी राणा यांची तळोजा कारागृहात तर खासदार नवनीत राणा यांची भायखाळा येथील महिला कारागृहात रवानगी होणार आहे
.राणा दाम्पत्याला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, आजच त्यांनी जामीन अर्ज देखील कोर्टात दाखल केला. त्यामुळं २९ एप्रिल रोजी या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. पण तत्पूर्वी २७ तारखेला सरकारला आपलं म्हणणं लेखी स्वरुपात मांडण्यास कोर्टानं सांगितलं आहे, अशी माहितीही यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली
सरकारविरोधात आव्हान दिल्याबरोबरच मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता २७ तारखेला सरकारी पक्षाला आपली लेखी बाजू मांडण्यास कोर्टानं सांगितलं आहे. विशेष सरकारी अॅड. वकील प्रदीप घरत यांनी दिली
दरम्यान, विविध कलमं लावून राणा दाम्पत्यावरील गुन्ह्यांची व्याप्ती वाढवली जात आहे. पण सर्व प्रकाराला कायदेशीररित्या उत्तर दिलं जाईल, असं राणा दाम्पत्याचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी म्हटलं आहे.