CRIME: हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 18 वर्षाच्या तरुणीला मारहाण करुन विनयभंग

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- फूरसूंगी परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तेजस हरपळे (वय-25 रा. फूरसूंगी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) सकाळी 11 च्या सुमारास घडला. आरोपीने यापूर्वी देखील पीडित तरुणीच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.  घरामध्ये कोणी नसताना जबरदस्तीने घरात घुसून एका 18 वर्षाच्या तरुणीला मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फूरसूंगी (Fursungi) येथे घडली आहे.पोलिसांनी तेजस सुनिल हरपळेयाच्यावर आयपीसी IPC 354, 354 ड, 452, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केलाआहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घरात कोणी नसताना आरोपी जबरदस्तीने घरात घुसला. त्याने पीडीत तरुणीला ‘तु मला खूप आवडतेस आपण पळून जाऊन लग्न करु’ असे म्हणाला. फिर्यादीने याला नकार दिला असता त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्याला विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. आरोपीने यापूर्वी देखील फिर्यादी त्याच्या सोबत बोलत नसल्याच्या रागातून तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Latest News