पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वजनिक उद्याने देखभाल दुरुस्ती साठी 1 कोटी 72 लाखा स मंजुरी

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – दीड वर्षाच्या या कामासाठी 1 कोटी 72 लाख खर्च आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. 26) मंजुरी दिली.उद्यान, रस्ते व वृक्षाची देखभाल करण्यासाठी मजूर पुरविण्यासाठी उद्यान विभागाने क्षेत्रीय कार्यालयानिहाय निविदा काढली होती. त्यासाठी चार वेगवेगळ्या संस्थेची निवड करण्यात आली आहे.त्यात अ क्षेत्रीय कार्यालयासाठी अथर्व स्वयंरोजगार औद्योगिक सेवा सहकारी संस्थेची 2.87 टक्के कमी असलेली 21 लाख 48 हजार 255 दराची निविदा पात्र ठरली. तसेच, फ क्षेत्रीय कार्यालयासाठी याच संस्थेची 2.16 टक्के कमी असलेली 21 लाख 63 हजार 959 दराची निविदा मंजूर झाली.पिंपरी-चिंचवड महापालिकेची शहरात असंख्य सार्वजनिक उद्याने आहेत. ती उद्याने तसेच रस्ते व वृक्ष देखभाल करण्याच्या कामासाठी मजूर पुरविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय निविदा काढण्यात आली होती. दीड वर्षाच्या या कामासाठी 1 कोटी 72 लाख खर्च आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. 26) मंजुरी दिली.

ब क्षेत्रीय कार्यालयासाठी अर्जुन आधार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 2 टक्के कमी असलेली 21 लाख 67 हजार 497 दराची निविदा पात्र ठरली.क क्षेत्रीय कार्यालयासाठी श्रमिक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 3.59 टक्के कमी असलेली 21 लाख 32 हजार 330 दराची निविदा मंजूर करण्यात आली. त्याच संस्थेला 21 लाख 34 हजार 321 दराची ई क्षेत्रीय कार्यालय आणि 21 लाख 48 हजार 255 दराची ग क्षेत्रीय कार्यालयाची निविदाही मंजूर करण्यात आली आहे.सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची ड क्षेत्रीय कार्यालयासाठी 2.87 टक्के कमी दराची 21 लाख 48 लाख 255 रक्कमेची आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी 2.87 कमी दराची 21 लाख 48 हजार 255 रक्कमेची निविदा पात्र ठरली आहे.

Latest News