रमझान ईद, अक्षय्यतृतीय,निमित्त शांतता रहावी, गुन्हेगारीवर वचक रहावा म्हणून वडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने रुट मार्च

पुणे : वडगाव शहरात नागरीकरण मोठया प्रमाणात वाढत असून विविध जाती, धर्माचे नागरिक, कामगार राहात आहेत. वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या वतीने रमझान ईद, अक्षय्यतृतीया तसेच गुन्हेगारीवर वचक रहावा या उद्देशाने वडगाव शहरामध्ये सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला.या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा रहावा, आगामी काळात शांतता रहावी, म्हणून वडगाव पोलिस स्टेशनच्यावतीने रुट मार्च काढत नागरिकांना शांतता राखण्याचा संदेश दिला

.वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, कामशेतचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, लोणावळ्याचे पोलिस निरीक्षक सिताराम डुबल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते, शिला खोत, विजय वडोदे, संतोष जाधवयांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड या रूटमार्च मध्ये सहभागी होते.वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेत सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला.मावळ पंचायत समिती पासून मुख्य बाजारपेठेने शिवाजी चौकापर्यंत रुट मार्च काढत जनतेला शांततेचा संदेश देत, शक्ती प्रदर्शन करण्यात आले.लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने पोटोबा मंदिरा समोर कवायत प्रत्याक्षिक सादर केले,

Latest News