ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन


पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने आज पहाटे (१ मे) निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या हाेत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
माहेरचा आहेर, अर्धांगी, दे दणादण, गडबड घोटाळा, धूमधडाका, सौभाग्यवती, सरपंच, ‘पागलपन’, ‘अर्जुन देवा’, ‘कुंकू झाले वैरी’ आणि ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या
. ‘पुलिसवाल्या सायकल वाल्या’ हे गाणे प्रचंड गाजले होते.संप्रेमा किरण यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, अशोक सराफ यांच्या बरोबरचे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांनी चित्रपटांसह अनेक मालिकांमध्येही अभिनय केला आहे. त्यांनी १९८९ साली ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती.