आर्या तावरे ला युरोपमधील तीस प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान


आर्याचे कुटुंब बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आहे. मूळच्या बारामतीकर असलेल्या आर्या कल्याण तावरे हिने जगभरात नावाजलेल्या फोर्ब्ज या मासिकात स्थान मिळविले आहे. युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षाखालील ३० प्रभावशाली व्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. त्यात आर्याला स्थान मिळाले आहे.
लंडन युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडल्यावर आर्या कल्याण तावरे हिने वयाच्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करणारा हा व्यवसाय होता. याशिवाय या क्षेत्रातील विशेषज्ञांना तसेच गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे पोर्टल म्हणूनही या स्टार्टअपने भूमिका बजावली. या कंपनीचे नाव फ्युचरब्रीक्स असे आहे. या कंपनीची आजचे बाजारमूल्य ३२.७ कोटी पौंड इतके असून ते आज २२ वेगवेगळ्या बांधकाम प्रकल्पांवर काम करत आहे.