चिंचवडमध्ये विस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून डॉक्टर महिलेवर वर बलात्कार…

पुणे: . मैत्रीच्या संबंधातून फिर्यादी यांना बालेवाडी येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी व्हिस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध केले. महिला बेशुद्ध झाल्यावर आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या होमिओपॅथी डॉक्टर असून आरोपी आणि त्यांची कॉलेजमध्ये असल्यापासून ओळख आहे. आरोपीने विस्कीमध्ये गुंगीचे औषध टाकून एका महिला होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.
याप्रकरणी 26 वर्षाच्या पीडित महिलेने गुन्हा दाखल केला आहे.वाकड पोलिसांनी पंकज अनिल खंडागळे (वय 28 रा. थेरगाव) याला अटक केली असून.आरोपीने पीडित महिलेला व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बालेवाडी आणि चिंचवड येथील लॉजवर बोलावून घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याशिवाय पंकज खंडागळे याने पीडित महिलेकडून वेळोवेळी 2 ते 3 लाख रुपये घेतले. मागील काही दिवसांपासून त्याचा भाऊ अखिलेश खंडागळे याच्या गुगल पे वर पैसे पाठवण्यास सांगून पीडित महिलेला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सी.एम. बोरकर करीत आहेत.