निगडी प्राधिकरण येथील महात्मा बसवेश्वर यांच्या शिल्पाचे रेंगाळलेले काम त्वरित पूर्ण करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

निगडी प्राधिकरण येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या शिल्पाचे रेंगाळलेले काम त्वरित पूर्ण करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथे महापालिकेच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा, महादेवाची पिंड, यासाठी लागणारया चौथारयाचे काम पूर्ण होऊन बरेच दिवस झाले आहे. या चौथर्यावर जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हि बसविण्यात आलेला आहे.समोर महादेवाची पिंडी बसवण्यात आलेली आहे. मात्र महात्मा बसवेश्वर व महादेवाची पिंड प्लास्टिक कागदाने झाकून ठेवण्यात आलेली आहे.समोर देखनी सूर्यकमान उभारण्यात आली आहे. या सूर्यकमानीतून महादेवाची पिंड व महात्मा बसवेश्वर यांचे दर्शन नागरिकांना होणार आहे. मात्र या भागाच्या वॉलकंपाऊंड व शिल्पाच्या मागील पुढील भागाचे सुशोभीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे हे शिल्प जवळ जवळ पूर्ण झालेले असतानाही त्याचे अनावरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रेंगाळलेले आहे.

त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून राहिलेली छोटी-मोठी कामे त्वरित पूर्ण करण्यासाठीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत.त्याच बरोबर हे काम लवकरात लवकर पूर्ण करून या शिल्पाचे अनावरण हि लवकरात लवकर व्हावे.हि आपल्याला नम्र विनंती आहे.हे काम,अनावरण लवकर झाले नाही तर आम्हाला नाईलास्तव आंदोलन करावे लागेल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे