आनंद दिघेंसारख्या प्रवृत्तीचं उदात्तीकरण नको- ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे


मुंबई : आनंद दिघेंवर सिनेमा काढण्याचा अधिकार त्यांच्या अनुयायांना नक्कीच आहे. पण खोटा इतिहास दाखवण्याचा नाही. नाहीतर तुमच्यात आणि काश्मीर फाईल्समध्ये काहीच फरक नाही. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर शिवसैनिकांनी सिंघानिया हॉस्पिटल जाळलं हे सुद्धा विसरु नका, असेही निखिल वागळे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणत आहेत.निखिल वागळे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात ते म्हणत आहेत की, आनंद दिघेंसारख्या भलत्या प्रवृत्तीचं उद्दात्तीकरण नको. दाऊद, अरुण गवळी, वरदराजन मुदलीयार, विरप्पन यांच्यासारख्या अनेक खलनायकांवर सिनेमे निघाले. आता आनंद दिघेंवर निघतोय. दिघे शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय होते हे खरं, पण तसे दाऊदपासून विरप्पनपर्यंत सगळेच आपल्या अनुयायांचे देव होते. अर्थात, त्यांचा धंदा कायदेशीर होता असं कुणीही म्हणणार नाही. आनंद दिघेंचाही व्यवहार कायदेशीर नव्हता. धर्मांचं आवरण देऊन ते धमक्या, खंडणी, समांतर न्यायालयं असे सगळे उद्योग करत होते. श्रीधर खोपकर यांच्या निमित्ताने राजकीय खुनबाजीही त्यांनी घडवून आणली. ते टाडाखाली तुरुंगातही गेले, असे निखिल वागळे म्हणत आहेत.ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असणारे शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या १३ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाचं नाव धर्मवीर असे आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली आहे. चित्रपटाची टॅगलाईन ‘गद्दारांना क्षमा नाही’ असे आहे. ८ मे रोजी मुंबईत धर्मवीर चित्रपटाचं ट्रेलर लॉंच इव्हेंट पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, अभिनेता सलमान खान, अभिनेत्री अमिषा पटेल उपस्थित होते. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असताना, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आनंद दिघेंसारख्या प्रवृत्तीचं उदात्तीकरण नको, असे म्हणत एकप्रकारे धर्मवीर या चित्रपटाबद्दल नाराजीचा सूर