पिंपरी महापालिकेची 46 प्रभाग, 139 नगरसेवक संख्या असणार

पिंपरी : ( परिवर्तनाचा सामना ) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 139 सदस्यांच्या महापालिका सभागृहात 22 सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी 11 असणार आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग 41, 44 आणि 6 हे प्रभाग आरक्षित असतील. त्यातील 41 आणि 44 या दोन प्रभागात एससी, एसटी दोन जागा राखीव राहतील.

त्यामुळे खुल्या प्रवर्गातील एका जागेसाठी मोठी चुरस होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून आता प्रतिक्षा आरक्षण सोडत कधी होणार त्याची आहे. महापालिकेची 139 नगरसेवक संख्या असणार आहे. तर, एकूण 46 प्रभाग असणार आहेत. अनुसूचित जाती (एससी) साठी 22 तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) 3 जागा राखीव आहेत. 114 जागा सर्वसाधारण गटासाठी असतील. अनुसूचित जातींसाठी संभाव्य 22 प्रभागातील जागा राखीव राहू शकतात. हे आरक्षण लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार उतरत्या क्रमाणे असणार आहे.

संभाव्य ज्या प्रभागात अनुसूचित जातीसाठी 22 जागा राखीव असणार आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत.

प्रभाग क्रमांकपरिसरएकूण लोकसंख्याअनुसूचित जाती लोकसंख्याअनुसूचित जाती %
२९भाटनगर – मिलिंदनगर3903616508४२.२९
१९चिंचवड स्टेशन – मोहननगर3391611571३४.१२
२०काळभोर नगर – विद्यानगर3658811482३१.३८
२२ओटा स्कीम – निगडी गावठाण3773811495३०.४६
४३दापोडी – गणेशनगर3926611134२८.३६
११इंद्रायणीनगर – बालाजीनगर383138950२३.३६
३७ताथवडे – पुनावळे – कालाखडक326647209२२.०७
१८मोरवाडी – अजमेरा – गांधीनगर382447999२०.९२
२४मामुर्डी -किवळे – रावेत387798023२०.६९
३४बापुजीबुवानगर – श्रीनगर340856871२०.१६
१६नेहरूनगर – विठ्ठलनगर354246950१९.६२
३५थेरगाव – बेलठिकानगर349576666१९.०७
१७वल्लभनगर – फुलेनगर – एच.ए कॉलोनी341506342१८.५७
४४पिंपळे गुरव – राजीवगांधीनगर400327011१७.५१
३९पिंपळे निलख – कावेरीनगर396526742१७.
३२तापकीरनगर – ज्योतिबानगर335845701१६.९८
४६जुनी सांगवी – ममतानगर469797919१६.८६
४१सुदर्शननगर- वैदूवस्ती340715653१६.५९
१४यमुनानगर – त्रिवेणीनगर – कृष्णानगर357115813१६.२८
चिखली321615209१६.२
२५वाल्हेकरवाडी – गुरुद्वारा395316375१६.१३
३८वाकड348735581१६

Latest News