ओबींसाना आरक्षण देण्याची ठाकरे सरकारची मानसिकता नाही- आमदार गोपीचंद पडळकर


पंढरपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन आमदार पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर चांगलीच आगपाखड केली. काँग्रेस फक्त वसुली करण्यात मशगुल आहे. त्यांचे मंत्री परदेशात फिरायला गेले आहेत. त्यांची अवस्था ना घर का ना घट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा येथे राजगादी मिळाली आहे. झोपायला बंगले मिळाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ओबीसी, मराठा यांच्या आरक्षणाविषयी काही देणे-घेणे नाही. केवळ त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचे आरक्षण गेल्याचेही त्यांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही. ओबीसी आरक्षणाची खरी मारेकरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. पवार कुटुंबीयांना महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिला नाही. ते त्या संस्कृतीचे राहिलेले नाहीत. पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (ता. १९ मे) पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
ओबींसाना आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नाही, केवळ आपल्या जवळच्या प्रस्थापितांना त्याचा राजकारणात फायदा व्हावा; म्हणूनच त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. श्रीलंकेतील घराणेशाहीला कंटाळून तेथील लोकांनी उद्रेक केला. तसाच उद्रेक पवारांच्या विरोधात ओबीसी समाज करेल, त्यामुळे शरद पवारांनी वेळीच साधवं व्हावे, असा इशाराही आमदार पडळकर यांनी या वेळी बोलताना दिला
, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयीची सगळी माहिती महाराष्ट्राला झाली आहे. पूर्वी लोक तुमच्या विरोधात बोलत नव्हते, त्याचा फायदा आजपर्यंत घेतला आहे. परंतु लोक आता बोलू लागले आहेत. हक्कांसाठी रस्त्यावरदेखील उतरण्याची तयारी आहे. आपल्या जवळच्या लोकांना व नातेवाईकांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सत्तेत वाटा मिळावा, यासाठीच शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची धडपड सुरु आहे.