छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता…


मुंबई : भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून ही खेळी खेळली जाणार आहे राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीचे वार वाहत आहे. छत्रपती संभाजीराजे नी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. अशात त्यांनी गुरुवारी (ता. १९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली , छत्रपती संभाजीराजे ना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्यानंतरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी सर्व आमदारांना पत्रही लिहिले होते. या पत्रात विजयी होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीराजे यांना सहकार्य करेल असे सांगितले होते. मात्र, आता संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.