मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बरोबर सात अपक्ष आमदारांची वर्षा निवास्थानी बैठक…
मुंबई :

.राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. दोन जागा लढवण्याची घोषणा करून मैदानात उडी घेतली आहे. यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अशातच राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदारांचे वजन वाढले आहे. काही अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी हजेरी लावली आहे. शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.राज्यसभेच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येऊ शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे मंत्री आणि शिवसेना नेते यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.
राज्यात १३ अपक्ष आमदार आहेत. त्यातील सात आमदारांनी वर्षावर हजेरी लावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अपक्ष आमदारांची वर्षा निवास्थानी बैठक बोलवली आहे. या बैठकीला राजेंद्र पाटील यड्रावकर (कोल्हापूर), मंजुषा गावित (धुळे), गीता जैन (मीरा भाईंदर), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), आशिष जैस्वाल (रामटेक), विनोद अग्रवाल (गोंदिया), नरेंद्र भोंडेकर (भंडारा) हे अपक्ष आमदार उपस्थित आहेत
राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी खासदारसंभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. यामुळं त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठा क्रांती मोर्चा मैदानात उतरला आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, यासाठी सर्वच पक्षातील मराठा आमदारांची मोर्चा भेट घेणार आहे.सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना लढविणार असल्याने शिवसेनेने उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती, ती ऑफर अद्यापही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. याच ऑफरच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्याची चर्चा होती.