लाल महालातील त्या प्रकारानंतर व्हिडीओ निर्मात्याचा जाहीर माफीनामा

पुणे :

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या लाल महालात चंद्रा लावणीचा व्हिडीओ केला. पण व्हिडीओ शुट करताना मनध्यानी तुम्हा सर्वांचे, शिवप्रेमींचा मन दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. माझ्यामुळे इतक्या लोकांचं मन दुखावलं जाईल असं माझ्या मनात कधीही आलं नाही. पण ही चुक माझ्याकडून झाली, हे जेव्हा मला कळालं त्याच क्षणी मी माझ्या सर्व सोशल मिडीयावरुन हा व्हिडीओ डिलीट केला. पण तो पर्यंत तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. मी माझ्या सर्व फॅन्स ना देखील तो व्हिडीओ पर्सनली मेसेज करुन डिलीट करायला सांगत आहे. पण मी हे जाणूनबुजून केलं असा मी स्वप्नातपण विचार करु शकत नाही. गाणं सुंदर असल्याने मी त्यावर व्हिडीओ करण्याचा विचार केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागतें.’ मॉं जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेला धक्का पोहचवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि कधीही नसेल, असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट करत माफी मागितली आहे.

 लाल महालात रिल्सच्या निमित्ताने चित्रपटातील लावणीच्या रिल्स शुटींग प्रकरणी आज फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजी ब्रिगेडसह काही पुरोगामी संघटनांनी यावर आक्षेप घेत रिल्सचे शुटींग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पुण्यातील फरासखाना पोलिसांनी लाल महालात नृत्य करणाऱ्या ‘वैष्णवी पाटील सह कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी कुलदीप बापट यांनी जाहीर माफी मागितली. त्यानंतर आता वैष्णवी पाटीलनेही आपल्या सोशल मिडीयावरुन शिवप्रेमींची माफी मागितली आहे. तिने आपल्या इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. तसेच तिच्यासोबत केदार अवसरे यांनीदेखील माफी मागितली आहे.

केदार अवसरे’नेही मागितली माफी-

एका अर्धवट ज्ञानातून आणि बालबुद्धीतून आम्ही हा व्हिडीओ केला. ही खरचं मोठी चूक आहे. त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो. त्यामागे तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता. माझी अपेक्षा आहे की मोठ्या मनाने तुम्ही आमची चूक पदरात घ्याल. आम्ही यापुढे चांगल काम करु आणि तुमच्या समोर येऊ. परत असं काही घडणार नाही, आश्वासन देतो. आम्ही हा व्हिडीओ फेमस होण्यासाठी केला नाही. आम्हाला आमची चूक मान्य आहे. आम्ही आमच्या मनापासून माफी मागत आहोत. कोणीही आमच्यावर दबाव टाकून हे करायला सांगितलेल नाही. त्या दिवशी आम्ही तिथून चाललो होतो. तिथे जाऊन आम्ही फक्त त्या माणसाला विचारलं की आम्ही शुट करु का, पण त्या माणसालाही माहिती नव्हतं की आम्ही तिथे लावणी शुट करणार आहोत. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही माफी मागण्यामागे कोणत्याही राजकीय पक्षाचा, नेत्याचा हात नाही. त्यामुळे याला कोणतही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करु नका, अशी विनंतही केदार अवसरेने केली आहे.

Latest News