कोल्हापूरात भाजपला बळ देण्यासाठी धनंजय महाडिकांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी?


मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातील संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे माजी खासदार संभाजीराजेहे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपकडून सहाव्या जागेसाठी शिवसेनेला टक्कर देण्यासाठई कोल्हापूरातीलच धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे
भाजपकडून पियुष गोयल यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, धनंजय महाडिक यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामध्ये महाडिकांना सहाव्या जागेसाठी उतरवले जाऊ शकते. कोल्हापूरात भाजपला बळ देण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जाऊ शकते, अशी चर्चा आहे
.शिवसेनेचे नेतेयांनी सोमवारी संजय पवार हेच उमेदवार असतील, असं स्पष्ट केलं आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तर राऊत हे शिवसेनेचे दुसरे उमेदवार असतील. सध्याचे सर्वच पक्षांचे संख्याबळ पाहता भाजपला सहापैकी दोन जागा मिळतात.
तर तिसऱ्या जागेसाठी 13 मते कमी पडत आहेत.शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. त्यानुसार आघाडीकडे सहाव्या जागेसाठी पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सहावी जागा लढवली जाणार आहे. या निवडणुकीत आघाडीचे पारडे जड असले तरी भाजपकडूनही उमेदवार उतरवला जाऊ शकतो.दरम्यान, शिवसेनेने सहाव्या जागेसाठी संजय पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे
. तेे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पवार हे मागील 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांकडे पाहिले जाते. कोल्हापूर महापालिकेत ते नगरसेवकही होते. सीमाप्रश्नी त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ते कोल्हापूरातीलच असल्याने शिवसेनेने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते.