छत्रपतींच्या गादीशी राजकारण तुम्हाला परवडणार नाही- मराठा समन्वयक


संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील आहेत. त्यांच्या उमेदवारीत शिवसेनेने आडकाठी करु नये. संजय राऊत उठसूठ याविषयी बोलत राहतात त्यांनी विनाकारण हा मुद्दा तापवू नये. संभाजीराजेंचा आदर करुन त्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा करावा अन्यथा आमच्याशी गाठ आहे असा इशाराही शिवसेनेला मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिला.शिवसेना राष्ट्रवादीने संभाजीराजेंना अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा द्यायला हवा आणि त्यांना दिलेला शब्द पाळायला हवा. असे मराठा समन्वयकांनी म्हटले आहे.शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्याने मराठा समन्वयकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. ”छत्रपतींच्या गादीशी राजकारण तुम्हाला परवडणार नाही. राज्यसभेच्या उमेदवारीत नाक खूपसु नये असा इशाराच शिवसेना खासदार संजय राऊत यांना मराठा समन्वयकांनी आज दिला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारीसाठी अटी-शर्थी ठेवल्याने संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली त्यानंतर शिवसेनेने राज्यसभेसाठी नव्या उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर संभाजीराजे मुंबईत तातडीने पोहचले आहेत.