स्वारगेट परिसरात साफसफाई करणाऱ्या महिलेचा डॉक्टर कडून विनयभंग

पुणे : डॉ. रमेश डुमरे यांचे हिराबाग येथे क्लिनिक आहे तेथे फिर्यादी या कामाला आहेत. २२ मे रोजी त्या क्लिनिकमध्ये साफसफाई करत असताना डॉ. डुमरे याने मागून येऊन फिर्यादीस पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले स्वारगेट पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.साफसफाई करत असताना पाठीमागून येऊन तिला पकडून तिचा डॉक्टरानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रमेश डुमरे असे या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२२) दिली आहे. हा प्रकार डुमरे यांच्या हिराबाग येथील क्लिनिकमध्ये २२ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला