केंद्राने जातीनिहाय ओबीसी जनगणना करावी , सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या – शरद पवार

पुणे : केंद्राने ओबीसी जनगणना करावी म्हणजे त्यानुसार न्याय वाटणी व्हावी, कोणी इथे फुकट मागत नाही. जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्याच्या हातात देशाची सूत्र आहेत ते करतील असे वाटत नाही, आपल्याला एकत्र याव लगेल असे शरद पवार म्हणाले.

रस्त्यावर आल्याशिवाय गत्यंतर नाही, ज्यांच्या हातात राज्य त्यांची मानसिकता वेगळी आहें. सत्य समोर आल तर चुकीचं वातावरण होईल? वस्तुस्थिती समोर आली तर अस्वस्थता येईल?कोर्टाने जे माहिती मागितली त्याबद्दल डेटा गोळा करायचे काम सुरू आहे. भाजप नेते,माजी मुख्यमंत्री सांगतात धोका दिला, पाच वर्ष सत्ता असताना, देशात सरकार असताना तुम्ही झोपला होता का? असा सवाल देखील शरद पवार यांनी भाजपला विचारला आहे

.राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. यादरम्यान आज राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट मोदी सरकारला जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या असे अवाहन केलं आहे.राज्यघटनेने एससी, एसटी सुविधा दिल्या अधिकार दिले समाजात हा मोठा वर्ग ओबीसी आहे. त्यांना आधार द्यायची गरज आहे. तो सन्मानाने उभा राहत नाही तो पर्यंत गरज आहे, समाजाच्या उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण दिलं पाहीले असे पवार म्हणाले.

Latest News