परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे, दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी….


मुंबई : दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून ही कारवाई सुरु केली आहे. या पथकात जवळपास चार अधिकारी आहेत.यांच्याशी संबधीत चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक पुण्यातही पोहचलं आहे.2017 मध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीतील 42 गुंठे जागा घेतल्यानंतर त्या जागेबाबतीत आपण कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात नव्हतो, असे मूळ जागा मालक विभास साठे यांनी पत्राद्वारे यापूर्वी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे त्यानंतर झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग केला आहे,” असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. परब यांच्या साई रिसॉर्ट बांधकामातील गैरव्यवहाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती.
यात विभास साठे यांनी किरीट सोमय्या यांना लिहिलेले पत्रच सादर केले. या पत्रात विभास साठे यांनी जागा विकल्यानंतर झालेल्या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.मंत्री अनिल परब यांनी 2 मे 2017 रोजी 1 कोटी रुपये देऊन विभास साठे यांच्याकडून 42 गुंठे शेत जमीन विकत घेतली, त्याचा ताबा घेतला. महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे,
पुण्यातील कोथरुड परिसरात विभास साठेयांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांनी दापोलीतील रिसोर्ट विभास साठे यांच्याकडून विकत घेतला होता. यात १ कोटी १० लाखांचा व्यवहार झाला होता, असे समजते. या व्यवहारात साठे यांना ब्लॅक मनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता मात्र या जागेवर त्यानंतर ज्या अकृषिक (बिनशेती) परवानग्या करण्यात आल्या त्याच्या संबंधी कोणतेही कागदपत्र, शपथपत्र, अर्ज, जबाब इत्यादींवर आपण सह्याचं केल्या नाहीत किंवा कोणालाही मुखत्यारपत्र दिलेले नाही, त्या जागेवर कोणतेही बांधकाम केलेले नाही. 19 जून 2019 ला खरेदीखताची औपचारिकता पूर्ण करतानाही ही शेत जमीन आहे, याच्या पश्चिम बाजूला समुद्र आहे असेही नमूद करण्यात आले होते,असे विभास साठे यांनी पत्रात नमूद केले आहे.