माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींविरोधात बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे माफीचा साक्षीदार

मुंबई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींविरोधात बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनेही त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याबाबतचा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयात दाखल केला आहे. सीबीआयने काही अटींच्या आधारावर या अर्जाला मंजूरी दिली आहे.

आता या अर्जावर 30 मे रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने या अर्जाला मंजूरी दिल्यास वाझे याच्याकडून अनेक खुलासे केले जाऊ शकतात दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वाझे याने याबाबत तपास यंत्रणांकडे अर्ज केला होता. या प्रकरणासंदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. CRPC कलम ३०६, ३०७ नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो, असे सचिन वाझेने पत्रात म्हटले होते

त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.देशमुखांचे वकील इंद्रपालसिंग यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी म्हटले होते की, सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार होऊ शकत नाही. वाझे हा अँटिला, मनसुख हिरेन हत्या आणि वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर या पूर्वीही गंभीर गुन्ह्या़ची नोंद आहे वाझे हा परमबीरसिंह यांच्या सांगण्यावरून अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करत आहे.

यापूर्वी चांदीवाल समितीसमोर सचिन वाझेने आपली साक्ष फिरवण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये देशमुखांनी मला वसुलीचे आदेश दिले होते आणि वसूल केलेले पैसे त्यांच्या लोकांना दिले, असा आरोप वाझेने केला होता. मात्र, समितीने तो फेटाळून लावला होता. चांदीवाल समितीसमोर सचिन वाझेने उलटतपासणीत, अनिल देशमुख यांनी त्याला बार आणि आस्थापणाकडून वसुलीचे आदेश दिले नसल्याचे सांगितले होते. पण आपण दबावापोटी देशमुखांच्या बाजूने साक्ष दिल्याचे वाझेने आयोगासमोर दिलेल्या पत्रात म्हटले होते

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या देशमुख आणि वाझे दोघेही कोठडीत असून चांदीवाल समितीकडून दोघांचीही चौकशी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआयनेही चौकशी केली आहे.

Latest News