संभाजीराजे यांची भावनिक पोस्ट….


राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीनेही सुरुवातीच्या काळात छत्रपतींना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं. मात्र, यावरून यूटर्न घेत शिवसेनेला पाठिंबा दिला.सेनेने छत्रपतींना शिवबंधन बांधण्याची ऑफर दिली होती. मात्र राजेंनी ती धुडकावल्याने राज्यसभेचा मार्ग त्यांच्यासाठी अवघड झाला. अखेर सेनेने कोल्हापुरातूनच जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देत खेळी केली. आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.येत्या जुलै महिन्यात मराहाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून माघार घेण्याीची शक्यता वाढली आहे. सकाळीच त्यांनी ट्वीट करत माझी बांधिलकी जनतेशी असल्याची पोस्ट केली. यानंतर चर्चा वाढल्या आहेत. मविआच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढावल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपने देखील त्यांना जाहीर समर्थन दिलेलं नव्हतं. त्यामुळे दिल्लीसाठी आकड्यांची समीकरणं जुळवताना संभाजीराजेंना कसरत करावी लागली.अखेर संभाजीराजे यांनी या लढतीतूनच माघार घेणार असल्याचं कळतंय. सामच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजीराजे काही वेळात भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, आकडेवारीचं राजकारण जूळवून आणण्यात संभाजीराजेंना यश न आल्याने ते माघार घेणार असल्याचं कळतंय.दरम्यान, संजय राऊत आणि संजय पवार यांनी त्यांचे राज्यसभेचे अर्ज दाखल केले आहेत. उद्या संजय राऊत थेट कोल्हापुरात जाऊन कार्यर्त्यांची भेट घेणार आहेत.