अंकनाद पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण


पुणे :
मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य शासनाची ‘राज्य मराठी भाषा संस्था’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या अंकनाद पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा (पर्व-३)चे पारितोषिक वितरण रविवारी आयोजित करण्यात आले आहे.रविवार,२९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सायन्स पार्क येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संस्थापक मंदार नामजोशी यांनी दिली. मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विज्ञान आख्यान’उपक्रमातील नाटिकाचे तसेच वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात येणार आहे.