शब्द मोडल्याचा आरोप ठेवून युती तोडणारे उद्धवजी आता बोला? – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


मुंबई : शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचं आव्हान उद्धवजींनी स्वीकारावं. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादं तथाकथित सेक्युलर नाव…” अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे
चंद्रकांत पाटील त्यांनी ट्वीट करत “राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचं छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?
२०१९ च्या निवडणुका भाजपा आणि शिवसेनेच्या आघाडीने लढवल्या होत्या. त्यानंतर निवडून आल्यावर मुख्यमंत्रीपदाच्या वादातून आघाडी मोडून महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा जन्म झाला होता. त्यानंतर भाजपाने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत शिवसेनेने भाजपावर टीका केली होती. दरम्यान संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द मोडल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर “शब्द मोडल्याचा आरोप ठेवून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?”
संभाजीराजेही खोटं बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणं कुठल्या सभ्यतेत बसतं?” असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी २०१९ च्या विधानसभा निववडणुकांची आठवण करून दिली आहे
छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुका लढवणार नसल्याचं आज स्पष्ट केलं आहे. शिवसनेने म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असं छत्रपती संभाजी राजे आजच्या पत्रकार परिषदेत बोलले आहेत.
आपण कुणापुढे झुकून लढणार नाही असं म्हणत त्यांनी ही राज्यसभा निवडणुक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली