पिंपरी चिंचवड. महानगरपालिका आरक्षण. सोडत25 पेक्षा जास्त पुरुष. नगरसेवकांना. फटका

पिंपरी चिंचवड. महानगरपालिका आरक्षण. सोडत
25 पेक्षा जास्त पुरुष. नगरसेवकांना. फटका

पिंपरी- पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये 25 पेक्षा जास्त पुरूष विद्यमान नगरसेवकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. या सर्व उमेदवारांच्या जागी महिलांचे आरक्षण पडल्यामुळे या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. तर अनेक गावकी-भावकीतील इच्छुक आमने-सामने येणार असल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपळे गुरव, चिंचवडगाव, चिखली, काळेवाडी, भोसरीगावठाणमधील अनेक विद्यमान पुरूष नगरसेवकांना महिला आरक्षणाचा जबर फटका बसला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022 या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आज (मंगळवार) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सुरूवातीला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आरक्षण सोडतीची कार्य पध्दती सांगितली. याप्रसंगी महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे आदी अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीच्या माजी सभापती सिमा सावळे, सारंग कामतेकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरूण पवार यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News