पुणे महापालिकेतील 173 पैकी 87 जागा महिलांसाठी राखीव…

पुणे- सभागृहात महिला जास्त
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असल्याने स्त्री आणि पुरुष नगरसेवकांची संख्या समसमान असणे अपेक्षीत आहे. पण पुणे महापालिकेतील नगरसेवक संख्या १७३ अशी विषम असल्याने त्याच आपोआप फायदा महिलांना मिळाला आहे. १७३ पैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. तर ८६ पुरुष नगरसेवक असणार आहेत. त्यातच सर्वसाधारण गटातून महिलेला उमेदवारी दिली व ती निवडून आली तर महिलांची संख्या ८७ पेक्षाही जास्त होऊ शकेलनिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महिला आरक्षणाची सोडत काढली आहे. १७३ पैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. या सोडतीवर १ जून ते ६ जून या कालावधीत हरकती व सूचना नोंदविता येतील. आयोगाच्या पुढील सूचनेनुसार या हरकतींवर सुनावणी घेतली जाईल.पुणे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडलेली असली तरी तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे कोणत्या प्रभागातील दोन जागा महिलांसाठी आरक्षीत असणार व सर्वसाधारण गटासाठी कोणते प्रभाग असणार यावरून दिग्गज माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते, इच्छुकांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी (ता. ३१) राज्य निवडणूक आयोगाने महिला आरक्षणासाठी सोडत काढून १७३ पैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव केल्या. त्यामध्ये ७४ ठिकाणी सर्वसाधारण गटातील महिला निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, निवडणूक शाखेचे उपायुक्त डॉ. यशवंत माने व नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ११ वाजता आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. या लॉटरी पद्धतीमध्ये महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आरक्षीत प्रभागाच्या चिठ्ठ्या काढल्या

सोईचे आरक्षण आल्याने टाळ्या
गणेश कला क्रीडा मंच येथे सोडत काढली जात असताना आरक्षण टिपून घेण्यासाठी आयोगाकडून सर्व उपस्थितांना छापील अर्ज देण्यात आला होता. त्यामध्ये सोडत कसे काढले जाणार याचे नियम व माहिती दिली होती. तसेच आरक्षण टिपण्यासाठी चार्ट तयार करून दिला आहे. लॉटरीचा ड्रम गोल फिरविल्यानंतर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यातून प्रभाग क्रमांकाची चिठ्ठी काढली जात होती. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या इच्छुकांना किंवा महिलांना प्रभाग सोईचा झाल्याने त्यांच्याकडून टाळ्या वाजवून स्वागत केले जात होते.


– विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सोडतीनुसार निश्‍चित झालेले प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग क्र. १ – धानोरी-विश्रांतवाडी
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २ – टिंगरेनगर-संजय पार्क
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३ – लोहगाव – विमाननगर
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४ – खराडी पूर्व-वाघोली
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५ – खराडी पश्‍चिम- वडगाव शेरी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ६ – वडगाव शेरी – रामवाडी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ७ – कल्याणी नगर – नागपूर चाळ
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ८ – कळस – फुलेनगर
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ९ – येरवडा
अ – अनुसूचित जाती महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. १० – शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ११ – बोपोडी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १२ – औंध – बालेवाडी
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १३ – बाणेर – सुस – म्हाळुंगे
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १४ – पाषाण – बावधन बुद्रूक
अ – अनुसूचित जमाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १५ – गोखलेनगर – वडारवाडी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १६ – फर्ग्युसन महाविद्यालय – एरंडवणे
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १७ शनिवार पेठ – नवी पेठ
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १८ – शनिवारवाडा – कसबा पेठ
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १९ – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम – रास्ता पेठ
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २० – पुणे स्टेशन – मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २१ – कोरेगाव पार्क – मुंढवा
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २२ – मांजरी बुद्रूक – शेवाळेवाडी
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २३ – साडेसतरा नळी – आकाशवाणी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २४ – मगरपट्टा – साधना विद्यालय
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २५ – हडपसर गावठाण – सातववाडी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. २६ – वानवडी गावठाण – वैदूवाडी
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २७ – कासेवाडी – लोहियानगर
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २८ – महात्मा फुले स्मारक – भवानी पेठ
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. २९- घोरपडे उद्यान – महात्मा फुले मंडई
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३० – जय भवानी नगर – केळेवाडी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३१ – कोथरूड गावठाण – शिवतीर्थनगर
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३२ – भुसारी कॉलनी – बावधन खुर्द.
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३३ – आयडियल कॉलनी – महात्मा सोसायटी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३४ – वारजे – कोंढवे धावडे
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३५ – रामनगर – उत्तमनगर
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३६- कर्वेनगर
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३७ – जनता वसाहत – दत्तवाडी
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३८ – शिवदर्शन – पद्मावती
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३९ – मार्केटयार्ड – महर्षी नगर
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४० – बिबवेवाडी – गंगाधाम
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४१ – कोंढवा खुर्द – मिठानगर
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४२ – रामटेकडी – सय्यदनगर
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४३ – वानवडी – कौसरबाग
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४४- काळे बोराटे नगर – ससाणे नगर
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४५ – फुरसुंगी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४६ – मोहमंद वाडी – उरुळी देवाची
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४७ – कोंढवा बुर्दूक – येवलेवाडी
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४८ – अप्पर सुपर इंदिरानगर
अ – अनुसूचित जाती महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४९- बालाजी नगर – शंकर महाराज मठ
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५० – सहकारनगर – तळजाई
अ – अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५१- वडगाव बुर्दूक- माणिकबाग
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५२ – नांदेड सिटी – सन सिटी
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५३ – खडकवासला – नऱ्हे
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५४- धायरी – आंबेगाव
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५५ – धनकवडी – आंबेगाव पठार
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५६- चैतन्यनगर – भारती विद्यापीठ
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ५७ – सुखसागर नगर – राजीव गांधीनगर
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण खुला

प्रभाग क्र. ५८ – कात्रज – गोकुळनगर
अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण
क – सर्वसाधारण

Latest News