४ जून रोजी ‘ गीत स्पंदने ‘ सुरेल मैफल,भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

४ जून रोजी ‘ गीत स्पंदने ‘ सुरेल मैफल

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गीत भक्ती ‘ प्रस्तुत ‘ गीत स्पंदने ‘ ही डॉ समीर दातार यांच्या स्वरचित गीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे . ही मैफल शनीवार, ४ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.

‘गीत-स्पंदने’ या कार्यक्रमात डॉ. समीर दातार यांनी शब्दबद्ध आणि स्वरबद्ध केलेली, संपूर्णपणे नवीन, आगळी वेगळी अशी बहारदार गाणी सादर केली जाणार आहेत.डॉ.भक्ती दातार,महेश पारगावकर ही गीते गायनातून सादर करणार आहेत.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२३ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

Latest News