रोटरी करणार पर्यावरणस्नेही उद्योगांचा सन्मान ! ‘ ग्रीन फॅक्टरी ‘ पुरस्कार सोहळा ४ जून रोजी

IMG-20220601-WA0209(1)

रोटरी करणार पर्यावरणस्नेही उद्योगांचा सन्मान !
……………..
‘ ग्रीन फॅक्टरी ‘ पुरस्कार सोहळा ४ जून रोजी

पुणे :

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रीन फॅक्टरी ‘ पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक 4 जून 22 रोजी संध्याकाळी 6 वाजता गांधी भवन,कोथरूड येथे होणार आहे.

याप्रसंगी सर्वोत्तम तीन उद्योगांना पर्यावरण पूरक कामे, पद्धती अंमलात आणल्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाचे सह संचालक सदाशिव सुरवसे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष दीपक करंदीकर, रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३१ चे नियोजित प्रांतपाल शितल शहा हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लघु अणि मध्यम उद्योगांसाठी पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन चे अध्यक्ष मनीष धोत्रे, सचिव अनिकेत साळुंखे, प्रकल्प समन्वयक केशव ताम्हनकर यांनी ही माहिती दिली. के.के. नाग प्रा.लि. यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे

Latest News